सोशल मीडिया वर येणारा इतिहास हा बहुतेकवेळा खऱ्या इतिहासा चा थोडासा संदर्भ घेऊन आपल्या सोयीप्रमाणे बाकीचे लिहून एका विशिष्ट समुदायाला हिनवणे अथवा मोठे करणे असे अर्थाचे असतात.आजकाल पुस्तक वाचायला वेळ नसतो पण असे काही वाचायला इंटरेस्ट असतो मग तोच चुकीचा इतिहास आपल्या डोक्यात बसतो.एखादा सिनेमा किंवा टीव्ही सिरीयल जर ऐतिहासिक असेल तर त्यात ही प्रेक्षकांची आवड लक्षात घेत चेंजस केले जातात कारण त्यांना पैसे कमवायचे असतात.इतिहासाशी त्यांचा काहीही संबंध नसतो एक स्टोरी म्हणून आणि TRP साठी काहीही मग कधी कधी पब्लिसिटी साठी वाद घडवला जातो किंवा असे विषय आणले जातात. बरं यातून होत एकच इतिहास हळू हळू चुकत जातो त्याचे वेगवेगळे अर्थ लागत जातात. पुढची पिढी तेच इतिहास मानते. त्यात सामान्य माणसे कधी कधी इतिहासकारा पेक्षा नेत्यांच्या चुकीच्या इतिहासावर सुद्धा बाजू घेतानाही बघितले आहे . युट्युब वर तर बऱ्याच वेळा इतिहास आपल्या पब्लिसिटी साठी वेगळा इतिहासच रचतात. यातून पुढे इतिहासकार यांची संज्ञा च बदलू शकते.... आणि इतिहास ही ....
- राजेंद्र मोरे.
- राजेंद्र मोरे.
No comments:
Post a Comment