जुन्या नोटीचे आकर्षण मला लई. कधी भेटली तर जपून ठेवायची सवय , पण कधी कधी नाईलाजाने द्यावे ही लागतात.एक रुपयाच्या नोटीबद्दल बोललात तर लहानपणी भरपूर एकदम कडक नोटा जमा केलेल्या पण कोणाची लग्नाची पत्रिका आली की बरं वाटायची कारण ही तसच होत .आपल्याकडे देणगी किंवा लग्नाला पाकीट करताना एक पद्धत आहे एक रुपया वर लावायची जसे 11,21,51,101,151 वैगेरे वैगेरे. आता व्हायचं अस की माझ्या नोटा गल्लीप्रसिद्ध( जगप्रसिद्ध होण्या इतपत नोटा नव्हत्या)मग बाकीचे पैसे घरचे द्यायचे आणि एक रुपयाची नोट माझ्या कडून. त्याबदल्यात मला 2 रुपये मिळायचे मी लय खुश .नंतर नंतर नोटी कमी झाल्या आणि पैसे ही मिळेनासे झाले.मग राहिलेल्या नोटा सांभाळून ठेवल्या लहानपणी ची आठवण म्हणुन.नंतर कोणीतरी सांगितले याची खूप किंमत आहे जर चेक कर नेट वर. मागेच एका मोबाइल सर्व्हिस प्रॉव्हायडेर ने इंटरनेट स्वस्त केल्या मुळे नेट वर बरिच शोधाशोध केली बरेच व्हिडिओ ही बघितले की किती किंमत मिळेल (अर्थातच लॉटरी ची अपेक्षा 5लाख ,10लाख)बरेच दिवस शोधल्यावर अस लक्षात आलं की त्यांची किंमत जास्त नाही तरीपण मनात एक वाटत होतं की एवढ्या नोटी मधील एक तर नोट मला जास्त किमतीची मिळेल.सगळे रेफरन्स चेक केले पुस्तक वाचली मग.....
मग एक नोट मिळाली तिच माझी सर्वात जास्त किमतीची नोट होती.तशी किंमत कमीच होती . तरी हस्ताक्षर ,प्रेफिक्स आणि इनसेट सर्व परत चेक केलं म्हटलं काही का असेना एवढी तर एवढी, मेहनत घेतले तर तेवढे तरी असे म्हणून कोण विकत घेतंय याचा शोध घेऊ लागलो. असे बरेच महिने गेले एक तर असे विकत घेणारे कमी आणि देणारेच जास्त, नंतर बरेच शोध घेतल्यावर एक चाळीशीच्या वयाची एक जाणकार व्यक्ती भेटली त्यांच्याशी मी सगळे बोललो पुस्तक दाखवलं ते घेण्यास तयार ही झाले .मी खुश झालो आणि मी ती नोट त्यांच्या समोर ठेवली .त्यांनी ती नोट नाकावरचा चष्मा जरा वर करून बघितली. आणि माझ्याकडे नजर फिरवली ( आता ते त्याची किंमत कमी करतील याचा मला अंदाज आलाच. ) या नोट वर तेलाचा डाग आहे शिवाय याची घडी घातलेली आहे त्यामुळे याची जास्त किंमत मिळणार नाही .मग ३५० नको २०० तरी द्या मी म्हंटलं.बाळा अस नसतं त्या नोटीवरील हस्ताक्षर ,प्रेफिक्स, इंसेट आणि नोटीच्या गुणवत्ते वर त्याची किंमत असते .खराब नोटा भरपूर आहेत पण त्याची किंमत जास्त डिमांड वाढल्यावरच वाढेल आता तू त्या जमा कर आणि जून्या साधारण नोटीच्या मागे ही तू एक रुपये ते दोन रुपये घेऊ शकतोस ,तुझ्यासाठी ते शुल्लक जरी असले तरी पैसे डबल करायला बँकेत दिलेस तरी 8 वर्ष लागतात.ही नोट एकदम सुस्थितीत असती तर तेवढी किंमत मिळाली असती , माझ्याकडे अश्या बऱ्याच नोटी आहेत तुला पाहिजे असतील तर तू घेऊन जाउ शकतोस ,बाकी तुझा नोटांचा संग्रह वाढावं बरीच वर्षे लागतील त्यांची किंमत वाढायला असे बोलुन ते निघून गेले.आत्ता पर्यंत केलेली धावपळ अशीच वाया कशी जाऊन देईन बरं मी.....
अजुनही नोटा गोळा करायचं सोडलं नाही. बघुयात कधी याच्यात उत्तम गुणवत्तेच्या आणखी नोटांची भर पडेल .....
-राजेंद्र मोरे
No comments:
Post a Comment