Tuesday, March 24, 2020

दुर्लक्षित इतिहासातले उत्तुर गाव....

इतिहास शोधताना....
 दुर्लक्षित इतिहासातले उत्तुर गाव....
जिल्हा कोल्हापूर
तालुका आजरा

इतिहास म्हटलं की पहिल छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवण आल्या खेरीज राहत नाही. त्यांचे नाम स्मरून हा लेख.
         जुनी नाणी शोधता शोधता आपला ,आपल्या गावाचा आपल्या आजूबाजूच्या गावाचा आणि तालुक्याचा इतिहास शोध घ्यायचे ठरवले.  आपल्या आजू बाजूला दोन किल्ले आहेत भुदरगड आणि सामनगडं दोन्ही किल्ले शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधलेले आहेत . म्हणजेच आपल्याला किती जुना इतिहास आहे. आता इतिहास शोधताना बऱ्याच गोष्टी काळाच्या आघात नष्ट झाल्याने काही पुरावे मिळत नाही ज्या गोष्टी आहेत त्या जतन करणे ही काळाची गरज आहे. कारण भविष्यात या ही गोष्टी दिसणे अशक्य होईल. वारसा ने येणाऱ्या गोष्टीमध्ये जुन्या लोकांच्या गोष्टी  ही आता येईनाशा झाल्यात. ज्यांना मोठा इतिहास आहे तिथे इतिहासकार पोहोचतात पण काही ठिकाणी छोटे मोठे इतिहासाचा उलगडा होणे राहूनच गेलेत. तोच काही उलगडा होण्याच्या अपेक्षेत.
     बरं आत्ता मुद्यावर येवू उत्तुर गावाचा संदर्भ भेटतो ते थेट पेशवे कालीन इचलकरंजी संस्थानचा काळात त्यावेळी इचलकरंजी ते आजरा अश्या त्यांच्या जाताना येताना मार्गातले मोठे गाव.एवढे सोडले तर बाकी काही संदर्भ मिळाले नाही जसे गावात एक तलाव आहे तो कोणी व कधी बांधला , महादेवाचे मंदिर कोणी बांधले व काही त्याचा इतिहास, मॉ फतिशाबी दर्गा व त्या खालील भुयार संकल्पना काय होती.

       यातील ज्या काही गोष्टी नजरेस आल्या त्या लिहिण्याचा प्रयत्न.

*तलाव* : हा तलाव पेशवेकालीन असावा हा अंदाज आहे. तलावाच्या समोर जिथं रहाट बसवले तिथे एक मोठा दगडी स्तंभ पडलेल्या अवस्थेत दिसतो.
लिहिलेले संगमरवरी दगडावरची लिखाण झिजले असल्यामुळे ते कधी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. बाकी तलाव सुस्थित आहे.

*महादेवाचे मंदिर.*
  महादेवाचे हे मंदिर प्रथम दर्शनी हेमाडपंथी असल्याचे वाटते. हे मंदिर तलावाच्या बाजूस आहे. त्याचा आजुबाजूस काही मूर्ती आहेत ज्या मंदिराबाहेर आहेत .त्यात शेवटी एक जी शिळा आहे ती बहुतेक तुटलेली वीरगळ आहे. उत्तुर स्टँड वरून  मंदिरात जाताना वाटेत एका घराच्या बाजूस एक छोटे मंदिर बनवले तेही वीरगळ असावे कारण शिवमंदिर जवळ वीरगळ सहज आढळतात. वीरगळ म्हणजे त्या गावातल्या वीर पुरुषांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेला दगडी अथवा लाकडी स्तंभ.

*माँ फतिशाबी दर्गा.*
हि दर्गा तलावाच्या परिसरात आहे , महादेवाच्या मंदिरासमोरच अश्या पद्धतीने बांधले की दर्ग्यातून थेट महादेवाचे दर्शन घेता येईल, अशी अख्ययिका ही सांगितले जाते, बाळा ला घेऊन  असलेली आई याच्या अख्याईकेची  ही दर्गा पेशवेकालीन असावे असा अंदाज आहे.हिंदू मुस्लिम एक्याची ही काय गोष्ट आहे ही समजून घेण्यासाठी इकडे तिकडे चौकशी केली परंतु काही खास हाती लागले नाही. जुने दगडी बांधकाम आत्ता पडलेले आहे. पण त्यांच्या पडलेल्या अवशेषांवरून त्याची नक्षी काम आणि भव्यता लपत नाही. अशपाक मकामदार यांच्याकडून दर्गा सुव्यवस्थित असतानाचा एक फोटो मिळाला. त्याच्या वडिलांनीही  संवर्धनासाठी बरीच मेहनत घेतलेली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद . त्यामुळे त्याची आणखी माहिती मिळाली. दर्ग्याच्या खालून पहिली दोन भुयारे होती.त्यांना भुदरगड आणि सामनगड अशी नावे होती असे तेथील रहिवाशी सांगतात.कदाचित गडावर जायची भुयारी मार्ग असतील . किंवा आणखी काही परंतु ते सुस्थितीत असते तर काही आणखी गोष्टी उलगडल्या असत्या.तुटलेले बांधकाम परत जसे तसे बांधणे फार अवघड काम आहे. परंतु त्याची माहिती समजून आपला एतिहासिक वारसा जपू शकतो.

आणखी एक उत्तुर ग्रामपंचायत च्या बाजूला एक शाळा आहे तिथे ही काही एतिहासिक वास्तू होती पण शाळा बांधताना पडलं असे समजते.

मी माझ्या पद्धतीने थोडी फार शोधाशोध करून थोडी माहिती गोळा केली आहे अजून काही कोणास माहीत असल्यास किंवा संदर्भ असल्यास जरूर कळवावे.आवडल्यास आपल्या आजूबाजूच्या गावाच्या ग्रुप वर शेअर करा.

             राजेंद्र मोरे.
      9987238044








Wednesday, March 6, 2019


          जुन्या नोटीचे आकर्षण मला लई. कधी भेटली तर जपून ठेवायची सवय , पण कधी कधी नाईलाजाने द्यावे ही लागतात.एक रुपयाच्या नोटीबद्दल बोललात तर लहानपणी भरपूर एकदम कडक नोटा जमा केलेल्या पण कोणाची लग्नाची पत्रिका आली की बरं वाटायची कारण ही तसच होत .आपल्याकडे देणगी किंवा लग्नाला पाकीट करताना एक पद्धत आहे एक रुपया वर लावायची जसे 11,21,51,101,151 वैगेरे वैगेरे. आता व्हायचं अस की माझ्या नोटा गल्लीप्रसिद्ध( जगप्रसिद्ध होण्या इतपत नोटा नव्हत्या)मग बाकीचे पैसे घरचे द्यायचे आणि एक रुपयाची नोट माझ्या कडून. त्याबदल्यात मला 2 रुपये मिळायचे मी लय खुश .नंतर नंतर  नोटी कमी झाल्या आणि पैसे ही मिळेनासे झाले.मग राहिलेल्या नोटा सांभाळून ठेवल्या लहानपणी ची आठवण म्हणुन.नंतर कोणीतरी सांगितले याची खूप किंमत आहे जर चेक कर नेट वर. मागेच एका मोबाइल सर्व्हिस प्रॉव्हायडेर ने इंटरनेट स्वस्त केल्या मुळे नेट वर बरिच शोधाशोध केली बरेच व्हिडिओ ही बघितले  की किती किंमत मिळेल (अर्थातच लॉटरी ची अपेक्षा 5लाख ,10लाख)बरेच दिवस शोधल्यावर अस लक्षात आलं की त्यांची किंमत जास्त नाही तरीपण मनात एक वाटत होतं की एवढ्या नोटी मधील एक तर नोट मला जास्त किमतीची मिळेल.सगळे रेफरन्स चेक केले पुस्तक वाचली मग.....
      मग एक नोट मिळाली तिच माझी सर्वात जास्त किमतीची नोट होती.तशी किंमत कमीच होती . तरी हस्ताक्षर ,प्रेफिक्स आणि इनसेट सर्व परत चेक केलं म्हटलं काही का असेना एवढी तर एवढी, मेहनत घेतले तर तेवढे तरी असे म्हणून कोण विकत घेतंय याचा शोध घेऊ लागलो. असे बरेच महिने गेले एक तर असे विकत घेणारे कमी आणि देणारेच जास्त, नंतर बरेच शोध घेतल्यावर एक चाळीशीच्या वयाची एक जाणकार व्यक्ती  भेटली त्यांच्याशी मी सगळे बोललो पुस्तक दाखवलं ते घेण्यास तयार ही झाले .मी खुश झालो आणि मी ती नोट त्यांच्या समोर ठेवली .त्यांनी ती नोट नाकावरचा चष्मा जरा वर करून बघितली. आणि माझ्याकडे नजर  फिरवली ( आता ते त्याची किंमत कमी करतील याचा मला अंदाज आलाच. ) या नोट वर तेलाचा डाग आहे शिवाय याची घडी घातलेली आहे त्यामुळे याची जास्त किंमत मिळणार नाही .मग ३५० नको २०० तरी द्या मी म्हंटलं.बाळा अस नसतं त्या नोटीवरील हस्ताक्षर ,प्रेफिक्स, इंसेट आणि नोटीच्या गुणवत्ते वर त्याची किंमत असते .खराब नोटा भरपूर आहेत पण त्याची किंमत जास्त डिमांड वाढल्यावरच वाढेल आता तू त्या जमा कर  आणि  जून्या साधारण नोटीच्या  मागे ही तू एक रुपये ते दोन रुपये घेऊ शकतोस ,तुझ्यासाठी ते शुल्लक जरी असले तरी पैसे डबल करायला बँकेत दिलेस तरी 8 वर्ष लागतात.ही नोट एकदम सुस्थितीत असती तर तेवढी किंमत मिळाली असती , माझ्याकडे अश्या बऱ्याच नोटी आहेत तुला पाहिजे असतील तर तू घेऊन जाउ शकतोस ,बाकी तुझा नोटांचा संग्रह वाढावं बरीच वर्षे लागतील त्यांची किंमत वाढायला असे बोलुन ते निघून गेले.आत्ता पर्यंत केलेली धावपळ अशीच वाया कशी जाऊन देईन बरं मी.....
        अजुनही नोटा गोळा करायचं सोडलं नाही. बघुयात कधी याच्यात उत्तम गुणवत्तेच्या आणखी नोटांची भर पडेल .....

-राजेंद्र मोरे


Tuesday, March 5, 2019

इतिहासाच्या शोधात

सोशल मीडिया वर येणारा इतिहास हा बहुतेकवेळा खऱ्या इतिहासा चा  थोडासा संदर्भ घेऊन आपल्या सोयीप्रमाणे बाकीचे लिहून एका विशिष्ट समुदायाला हिनवणे अथवा मोठे करणे असे अर्थाचे असतात.आजकाल  पुस्तक वाचायला वेळ नसतो पण असे काही वाचायला इंटरेस्ट असतो मग तोच चुकीचा इतिहास आपल्या डोक्यात बसतो.एखादा सिनेमा किंवा टीव्ही सिरीयल जर ऐतिहासिक असेल तर त्यात ही प्रेक्षकांची आवड लक्षात घेत चेंजस केले जातात कारण त्यांना पैसे कमवायचे असतात.इतिहासाशी त्यांचा काहीही संबंध नसतो एक स्टोरी म्हणून आणि TRP साठी काहीही मग कधी कधी पब्लिसिटी साठी वाद घडवला जातो किंवा असे विषय आणले जातात. बरं यातून होत एकच इतिहास हळू हळू चुकत जातो त्याचे वेगवेगळे अर्थ लागत जातात. पुढची पिढी तेच  इतिहास मानते. त्यात सामान्य माणसे कधी कधी  इतिहासकारा पेक्षा नेत्यांच्या चुकीच्या इतिहासावर सुद्धा बाजू घेतानाही  बघितले आहे . युट्युब वर  तर बऱ्याच वेळा इतिहास आपल्या पब्लिसिटी साठी वेगळा इतिहासच रचतात.   यातून पुढे इतिहासकार यांची   संज्ञा च बदलू शकते.... आणि इतिहास ही ....

- राजेंद्र मोरे.