इतिहास शोधताना....
दुर्लक्षित इतिहासातले उत्तुर गाव....
जिल्हा कोल्हापूर
तालुका आजरा
इतिहास म्हटलं की पहिल छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवण आल्या खेरीज राहत नाही. त्यांचे नाम स्मरून हा लेख.
जुनी नाणी शोधता शोधता आपला ,आपल्या गावाचा आपल्या आजूबाजूच्या गावाचा आणि तालुक्याचा इतिहास शोध घ्यायचे ठरवले. आपल्या आजू बाजूला दोन किल्ले आहेत भुदरगड आणि सामनगडं दोन्ही किल्ले शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधलेले आहेत . म्हणजेच आपल्याला किती जुना इतिहास आहे. आता इतिहास शोधताना बऱ्याच गोष्टी काळाच्या आघात नष्ट झाल्याने काही पुरावे मिळत नाही ज्या गोष्टी आहेत त्या जतन करणे ही काळाची गरज आहे. कारण भविष्यात या ही गोष्टी दिसणे अशक्य होईल. वारसा ने येणाऱ्या गोष्टीमध्ये जुन्या लोकांच्या गोष्टी ही आता येईनाशा झाल्यात. ज्यांना मोठा इतिहास आहे तिथे इतिहासकार पोहोचतात पण काही ठिकाणी छोटे मोठे इतिहासाचा उलगडा होणे राहूनच गेलेत. तोच काही उलगडा होण्याच्या अपेक्षेत.
बरं आत्ता मुद्यावर येवू उत्तुर गावाचा संदर्भ भेटतो ते थेट पेशवे कालीन इचलकरंजी संस्थानचा काळात त्यावेळी इचलकरंजी ते आजरा अश्या त्यांच्या जाताना येताना मार्गातले मोठे गाव.एवढे सोडले तर बाकी काही संदर्भ मिळाले नाही जसे गावात एक तलाव आहे तो कोणी व कधी बांधला , महादेवाचे मंदिर कोणी बांधले व काही त्याचा इतिहास, मॉ फतिशाबी दर्गा व त्या खालील भुयार संकल्पना काय होती.
यातील ज्या काही गोष्टी नजरेस आल्या त्या लिहिण्याचा प्रयत्न.
*तलाव* : हा तलाव पेशवेकालीन असावा हा अंदाज आहे. तलावाच्या समोर जिथं रहाट बसवले तिथे एक मोठा दगडी स्तंभ पडलेल्या अवस्थेत दिसतो.
लिहिलेले संगमरवरी दगडावरची लिखाण झिजले असल्यामुळे ते कधी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. बाकी तलाव सुस्थित आहे.
*महादेवाचे मंदिर.*
महादेवाचे हे मंदिर प्रथम दर्शनी हेमाडपंथी असल्याचे वाटते. हे मंदिर तलावाच्या बाजूस आहे. त्याचा आजुबाजूस काही मूर्ती आहेत ज्या मंदिराबाहेर आहेत .त्यात शेवटी एक जी शिळा आहे ती बहुतेक तुटलेली वीरगळ आहे. उत्तुर स्टँड वरून मंदिरात जाताना वाटेत एका घराच्या बाजूस एक छोटे मंदिर बनवले तेही वीरगळ असावे कारण शिवमंदिर जवळ वीरगळ सहज आढळतात. वीरगळ म्हणजे त्या गावातल्या वीर पुरुषांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेला दगडी अथवा लाकडी स्तंभ.
*माँ फतिशाबी दर्गा.*
हि दर्गा तलावाच्या परिसरात आहे , महादेवाच्या मंदिरासमोरच अश्या पद्धतीने बांधले की दर्ग्यातून थेट महादेवाचे दर्शन घेता येईल, अशी अख्ययिका ही सांगितले जाते, बाळा ला घेऊन असलेली आई याच्या अख्याईकेची ही दर्गा पेशवेकालीन असावे असा अंदाज आहे.हिंदू मुस्लिम एक्याची ही काय गोष्ट आहे ही समजून घेण्यासाठी इकडे तिकडे चौकशी केली परंतु काही खास हाती लागले नाही. जुने दगडी बांधकाम आत्ता पडलेले आहे. पण त्यांच्या पडलेल्या अवशेषांवरून त्याची नक्षी काम आणि भव्यता लपत नाही. अशपाक मकामदार यांच्याकडून दर्गा सुव्यवस्थित असतानाचा एक फोटो मिळाला. त्याच्या वडिलांनीही संवर्धनासाठी बरीच मेहनत घेतलेली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद . त्यामुळे त्याची आणखी माहिती मिळाली. दर्ग्याच्या खालून पहिली दोन भुयारे होती.त्यांना भुदरगड आणि सामनगड अशी नावे होती असे तेथील रहिवाशी सांगतात.कदाचित गडावर जायची भुयारी मार्ग असतील . किंवा आणखी काही परंतु ते सुस्थितीत असते तर काही आणखी गोष्टी उलगडल्या असत्या.तुटलेले बांधकाम परत जसे तसे बांधणे फार अवघड काम आहे. परंतु त्याची माहिती समजून आपला एतिहासिक वारसा जपू शकतो.
आणखी एक उत्तुर ग्रामपंचायत च्या बाजूला एक शाळा आहे तिथे ही काही एतिहासिक वास्तू होती पण शाळा बांधताना पडलं असे समजते.
मी माझ्या पद्धतीने थोडी फार शोधाशोध करून थोडी माहिती गोळा केली आहे अजून काही कोणास माहीत असल्यास किंवा संदर्भ असल्यास जरूर कळवावे.आवडल्यास आपल्या आजूबाजूच्या गावाच्या ग्रुप वर शेअर करा.
राजेंद्र मोरे.
9987238044

No comments:
Post a Comment